चिक्कोडी तालुक्यातील काडापूर येथे नूतन ‘स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय ग्रामीण कृषी संघा’चे उद्घाटन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बिनव्याजी कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी केल्याचे सांगितले. कृषी संघांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर खते आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर राहील, असे प्रकाश हुक्केरी यांनी नमूद केले. तसेच स्थानिक मराठा समाजाची भवन उभारणीची मागणी तातडीने मार्गी लावली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
संघाचे अध्यक्ष प्रकाश राचन्नवर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या संघाची स्थापना करण्यात आली असून, यासाठी प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांची मोठी प्रेरणा लाभली आहे.
यावेळी आप्पासाहेब सनदी, संभाजी पवार, शिवाजी शिंदे, भरत कोळेकर, महांतेश पाटील, मारुती गुरुनाथ, संघाचे उपाध्यक्ष रवी ठुबाके, कृष्णा शिंदे, चिदानंद शिरोळे, राजू जाधव, शिवाजी गोपाळ गौंडी, संजय सनदी, अर्चना विठ्ठल कोळेकर, सुनीता कोरे, तानाजी दायींगडे, कुमार वाघमारे, राजू धरेप्पा तळवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments