बागलकोट शहरातील नवनगर येथील वांबे कॉलनीमध्ये सरकारी जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात येत असलेली अनधिकृत मशीद नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत हटवली आहे. सार्वजनिक वापराच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या जागेवर काही लोकांनी अनधिकृतपणे शेड उभारून त्याला ‘मस्जिद अराफात’ असे नामफलक लावले होते. या अतिक्रमणाची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. नागरिकांनी जिल्हाधिकारी, नगरपालिका आयुक्त आणि पोलीस विभागाकडे लेखी तक्रार करून हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित हटवण्याची मागणी केली होती.
सार्वजनिक तक्रारीची दखल घेत शनिवारी सकाळी नवनगर पोलीस आणि नगरपालिका अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अनधिकृतपणे उभारलेले ते शेड प्रशासनाने पूर्णपणे जमीनदोस्त केले. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या येथील परिस्थिती शांत असून, सरकारी जागेवर अतिक्रमण न करण्याच्या कडक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.


Recent Comments