बागलकोट येथे पत्रकारांशी बोलताना कुडलसंगम बसवधर्म पीठाच्या पीठाध्यक्षा डॉ. माता गंगादेवी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा, असे मत व्यक्त केले आहे.

सिद्धरामय्या यांनी माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली असून ते अर्स यांच्याप्रमाणेच निष्ठेने लोकहिताची कामे करत आहेत. विशेषतः बसवण्णांवर त्यांची अढळ श्रद्धा असून प्रत्येक भाषणात ते आपण बसव तत्त्वांचे अनुयायी असल्याचे अभिमानाने सांगतात. सिद्धरामय्या यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून बसव तत्त्वे स्पष्टपणे दिसून येतात, असे डॉ. माता गंगादेवी यांनी स्पष्ट केले.
आमच्यासाठी सर्व व्यक्ती समान असून कोणामध्येही भेदभाव नाही. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देखील चांगले काम करत आहेत, मात्र सिद्धरामय्या यांना मोठा राजकीय अनुभव असून त्याचा लाभ राज्याला मिळण्यासाठी त्यांनी पूर्ण काळ मुख्यमंत्रीपदी राहणे योग्य ठरेल. सिद्धरामय्या यांनी आपल्या कार्यकाळातील उर्वरित दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण करावीत, अशी आमची इच्छा असल्याचे डॉ. माता गंगादेवी यांनी म्हटले आहे.


Recent Comments