Belagavi

बेळगाव पोलिसांची जुगार आणि अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर धाड

Share

बेळगाव शहर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून जुगार, दारू तस्करी आणि गांजा विक्री करणाऱ्या ८ जणांना अटक केली आहे.

एपीएमसी पोलिसांनी समीर पठाण, बबन जोशी, सलीम लष्करवाले आणि इलियास पठाण यांना पत्त्यांच्या जुगारावर तर मार्केट पोलिसांनी दीपक सावंत याला मटका जुगारावर धाड टाकून ताब्यात घेतले. तर सीसीबी पोलिसांनी खानापूर रोडवर कारवाई करत हनुमंत नायकर आणि रमेश मुळीमनी या बागलकोटच्या दोघांकडून सुझुकी कारसह ५ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. तसेच माळमारुती पोलिसांनी राहुल बंती याला गांजासह अटक केली. या कारवाईत एकूण ५,२४,४४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही यशस्वी कामगिरी एपीएमसीचे एएसआय संजय होनवाड, मार्केटचे पीएसआय हुसेनसाब केरूर, सीसीबीचे पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि माळमारुतीचे पीएसआय श्रीशैल हुलगिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी सर्व पथकांचे अभिनंदन केले आहे.

Tags: