समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थ सेवा बजावून इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या उगार लायन्स क्लबचे कार्य इतर शाखांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार लायन्स क्लब बेळगाव जिल्ह्याचे झोनल चेअरमन मल्हारी दिवटे यांनी काढले.


बुधवारी सायंकाळी उगार येथील लायन्स क्लबच्या शाखेत पार पडलेल्या आढावा बैठकीत बोलताना मल्हारी दिवटे यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला. आजचे अनेक तरुण समाजसेवेपेक्षा मोबाईलमध्ये जास्त वेळ वाया घालवत असल्याचे दिसून येते, ही सवय सोडून युवकांनी सामाजिक कार्यात अधिक रस घेऊन सक्रिय सेवा द्यावी, असे त्यांनी म्हटले.
उगार लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संजय साबडे यांनी गेल्या सहा महिन्यांत राबवण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. क्लबच्या माध्यमातून केवळ आरोग्यच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रातही काम करण्यात आले आहे. गरजू विद्यार्थ्यांना खाऊच्या किटचे वाटप करण्यात आले असून अनेक गरीब कुटुंबांना वेळोवेळी मदतीचा हात देण्यात आला आहे, असे डॉ. साबडे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला बेळगाव टिळकवाडी लायन्स क्लबचे सदस्य प्रकाश आणि रमेश अनिगेरी, उगार लायन्स क्लबचे सचिव सुभाष हेब्बाळी, आनंद कुंभार, माजी अध्यक्ष राहुल शाह, डॉ. बी. ए. पाटील, जगदीश पटवर्धन, बी. एन. चौगुले, राजेंद्र पोतदार, मनोज मालगत्ते, सी. ए. श्रीकांत भट, आर. जी. किल्लेदार, पायप्पा कूडुवक्कलगी, डॉ. अमोल सरडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments