नंदगडच्या पुण्यभूमीतून संगोळी उत्सवानिमित्त निघालेली ‘क्रांतीवीर संगोळी रायण्णा वीर ज्योती’ यात्रा आज बेळगावमध्ये दाखल झाली. यात्रेचे शहरात येताच नागरिकांनी आणि प्रशासनाने मोठ्या उत्साहात स्वागत केले.


बेळगाव शहराच्या मुख्य राणी चन्नम्मा चौकात महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी वीर ज्योतीचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार बसवराज नगराळ, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री, मार्केट पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व इतर मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांची मूर्ती असलेल्या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रथासमोर सादर करण्यात आलेल्या वीरगासे आणि इतर पारंपरिक लोककलांच्या पथकांनी वातावरणात चैतन्य भरले.




Recent Comments