Bagalkot

धावत्या एसटी बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका

Share

बागलकोट जिल्ह्यातील केरूळ शहरात केएसआरटीसी बसने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धावत्या बसमध्येच ही घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळूरहून बागलकोटच्या दिशेने येणाऱ्या रात्रीच्या बसमध्ये सुमारे ६५ वर्षीय वृद्ध प्रवास करत होते. बस केरूळ स्थानकावर पोहोचली असता सर्व प्रवासी उतरले, मात्र ही व्यक्ती जागीच होती. प्रवासी गाढ झोपेत असावेत, असे समजून कंडक्टर त्यांना उठवण्यासाठी गेले असता हा मृत्यू झाल्याचे समोर आले.

प्रवासादरम्यान तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने या वृद्धाने सीटवरच प्राण सोडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच केरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मृताची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. धावत्या बसमध्येच प्रवाशाचा मृत्यू झाल्याने सहप्रवाशांमध्ये भीतीचे आणि खेदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: