बेळगावमधील हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिराच्या दुसऱ्या क्रॉस कॉर्नरवर गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला कचरा म्हणजेच ‘ब्लॅक स्पॉट’ हटवण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक २९ चे नगरसेवक नितीन जाधव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा परिसर स्वच्छ झाला आहे.


नगरसेवक नितीन जाधव यांनी आपल्या कार्यतत्परतेने वॉर्ड क्रमांक २९ मधील आतापर्यंत तब्बल १९ ब्लॅक स्पॉट यशस्वीपणे हटवले आहेत. संपूर्ण वॉर्ड कचराकुंडी मुक्त आणि ‘ब्लॅक स्पॉट मुक्त’ करण्याचा संकल्प त्यांनी केला असून, त्या दिशेने वेगाने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेच्या वेळी अजय भाटिया, हर्षकुमार मोहिरे, कला भाटिया, अमित भाटिया, गंगाधर तुरमुंडी यांच्यासह महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण मोहिते, गजानन मुळीक आणि इतर नागरिक उपस्थित होते.


Recent Comments