मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर चाकू हल्ला करणाऱ्या चारही आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.


आज बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कारवाईचा तपशील दिला. मंगळवारी क्लब रोडवर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून शिवय्या पुजारी, मितेश बडिगेर, मोनाप्पा पाटील आणि संपत कडोलकर या चौघांना अटक केली आहे. या हल्ल्यादरम्यान स्वतः आरोपी मितेश बडिगेर हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.


Recent Comments