बेळगाव शहरातील महाद्वार रोड येथील रहिवासी, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावान कार्यकर्ते गजानन ईरप्पा आपटेकर यांचे आज पहाटे राहत्या घरी निधन झाले.

गजानन आपटेकर हे माजी नगरसेविका लक्ष्मीबाई गजानन आपटेकर यांचे पती होते. तसेच भारतीय सैन्यात मेजर म्हणून कार्यरत असलेले पवन गजानन आपटेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे आणि बहिणी असा मोठा परिवार आहे.
मंगळवारी दुपारी २:०० वाजता महाद्वार रोड येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून सदाशिव नगर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तसेच गुरुवारी सकाळी ८:०० वाजता अस्थी विसर्जन विधी पार पडणार आहे.


Recent Comments