वेदांत फाउंडेशनतर्फे दिला जाणारा २०२६ या वर्षाचा ‘वेदांत एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाला असून, बेळगावातील विविध क्षेत्रांतील ९ साधकांची यासाठी निवड करण्यात आली आहे.


या पुरस्काराचे स्वरूप १००० रुपये रोख, सन्मानपत्र, शाल, हार आणि श्रीफळ असे आहे. समाजाचे स्वास्थ्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या ‘नवरत्नांचा’ गौरव करणे हा फाउंडेशनचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थापक सतीश पाटील यांनी सांगितले.

यावर्षी पुरस्कारासाठी निवड झालेल्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे: शिक्षक विभागातून शेखर करंबळकर, युवराज रत्नाकर, कल्लाप्पा बी. पाटील आणि उमेश बाळेकुंद्री यांची निवड झाली आहे. पत्रकारितेतून ज्येष्ठ पत्रकार बी. बी. देसाई, विलास जोशी आणि जितेंद्र शिंदे यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच पोलीस दलातून श्रीकांत उप्पार आणि महेश पाटील या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या कार्यक्रमासाठी उद्योजक आर. एम. चौगुले, जीवन शापूरकर, धनश्री सोसायटी व इतर मान्यवरांनी आर्थिक मदत आणि भोजनाची व्यवस्था करून मोलाचे सहकार्य केले आहे.

हा भव्य पुरस्कार सोहळा १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता बेळगावातील टिळकवाडी येथील ‘वरेरकर नाट्य संघ सभागृहात’ आयोजित करण्यात आला आहे. बेळगावचे महापौर मंगेश पवार या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार असून उपमहापौर वाणी जोशी आणि डीसीपी निरंजनराज अरास यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


Recent Comments