धारवाड शहरात आगीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून सोमवारी ओम्नी कार जळाल्याची घटना ताजी असतानाच आज एका चहाच्या टपरीला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.


धारवाडमधील मुरुघराजेंद्र नगरमध्ये सोमवारी सिलिंडर गळतीमुळे ओम्नी कारने पेट घेतला होता, ज्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज एमिकेरी भागातील एका चहाच्या दुकानाला अचानक आग लागली. आगीचे लोळ पाहून स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. नागरिक आणि जवानांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठी वित्तहानी टळली आहे.


Recent Comments