रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका दिव्यांग वृद्धाची सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच सुटका करून त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. कार्यकर्त्यांच्या या तत्परतेमुळे एका असहाय्य व्यक्तीला वेळेवर उपचार मिळून त्याचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.


सदर वृद्ध व्यक्ती अत्यंत दयनीय आणि गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यानंतर, उशीर न करता या जखमी वृद्धाला तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
या बचाव कार्यात अॅलन विजय मोरे, अवधूत तुदवेकर, संतोष दरेकर, राजू टक्केकर, निलेश हिरेहोळी, मायकल पिंटो, रुग्णवाहिका चालक आणि इतर स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. कार्यकर्त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.


Recent Comments