“विद्युत संघ आणि ग्रामपंचायत निवडणुका जिंकणे म्हणजे महायुद्ध जिंकल्यासारखे नाही. जारकीहोळींना हरवणे इतके सोपे नाही,” या माजी खासदार रमेश कत्ती यांच्या विधानाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. २

०२८ च्या निवडणुकीत काय होईल ते तेव्हाच बघू, निवडणुका हे काही जाहीरपणे सांगण्याचे युद्ध नसते, अशा शब्दांत त्यांनी कत्ती यांना प्रत्युत्तर दिले. हुक्केरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. दिवंगत देवराज अर्स यांचा विक्रम मोडीत काढणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील अर्थसंकल्पही तेच मांडतील, असा विश्वास जारकीहोळी यांनी व्यक्त केला. पक्षांतर्गत नेतृत्व बदलाच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बळ्ळारी येथील बॅनर वाद आणि डीसीसी बँक युनियन नेत्यावरील हल्ला प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणांचा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. रमेश कत्ती यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, राजकारणात प्रत्येक जण विजयाचा निर्धार करूनच मैदानात उतरतो, आमची रणनीती वेळ आल्यावरच समजेल असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.


Recent Comments