नवीन वर्षातील पहिली अंगारिका संकष्टी चतुर्थी बेळगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली. मंगळवारी ही चतुर्थी आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले असून, शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा करण्यात आल्या.

बेळगावचे ग्रामदैवत आणि राणी चन्नम्मा चौकातील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली. गणरायाला विशेष अभिषेक, पंचामृत स्नान आणि आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. अंगारिका चतुर्थीचे विशेष औचित्य साधून बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती.
केवळ चन्नम्मा चौकातील मंदिरच नव्हे, तर शहरातील इतर भागांतील गणेश मंदिरांमध्येही उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. भाविकांनी दिवसभर उपवास करून संकष्टनाशक स्तोत्रांचे पठण केले. मंदिर समित्यांच्या वतीने भाविकांसाठी दर्शनाची सुव्यवस्थित सोय आणि महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाचे दर्शन घेऊन सुख-समृद्धीचे साकडे घातले.


Recent Comments