कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या गौरवशाली क्षणाचे औचित्य साधून विजापूर शहरातील मुख्य गांधी चौक येथे सिद्धरामय्या यांच्या चाहत्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

दिवंगत माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांचा सर्वाधिक काळ (७ वर्षे २१३९ दिवस) पदावर राहण्याचा विक्रम सिद्धरामय्या यांनी आज मागे टाकला आहे. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सिद्धरामय्या यांच्या चाहत्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांची ही वाटचाल राज्याच्या विकासासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोहन दळवाई, सतीश अडवी, डीसीसी बँकेचे माजी संचालक बीरप्पा जुमनाळ, कुरुबा समाजाचे नेते देवकांत बिज्जरगी, वक्ते मोहन मेटी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments