Belagavi

बेळगावातील वाहतूक कोंडीवर उपाय; खासगी बससाठी चार स्वतंत्र थांबे निश्चित

Share

बेळगाव शहरातील वाढती रहदारी नियंत्रित करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी खासगी बससाठी शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. या संदर्भात आज पोलीस आयुक्तालयात खासगी बस चालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

शहरात दररोज सुमारे ७९ खासगी बस लांब पल्ल्याचा प्रवास करतात. आरटीओ कार्यालय आणि रामदेव सर्कल यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी बस थांबवून प्रवासी चढवले जात असल्यामुळे सुटीच्या दिवशी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून भरतेश कॉलेज शेजारी आणि धर्मनाथ सर्कलसह महामार्गालगत बस थांबवण्यासाठी जागा सुचवण्यात आल्या आहेत. या नवीन योजनेमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आयुक्त भूषण बोरसे यांनी व्यक्त केला.

या बैठकीला डीसीपी निरंजनराजे अर्स, एसीपी ज्योतिबा निकम, सीपीआय श्रीकांत तोटगी आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Tags: