Dharwad

धारवाडमध्ये ओम्नी कार जळून खाक

Share

धारवाड येथील मुरघराजेंद्र नगर भागात घरासमोर उभी असलेली ओम्नी कार सिलिंडर गळतीमुळे अचानक पेटल्याची घटना घडली. या आगीत कारचा मोठ्या प्रमाणावर कोळसा झाला असून आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता. या दुर्घटनेत कार मालकाला आगीच्या झळा लागून ते जखमी झाले आहेत.

मुरघराजेंद्र नगरमधील एमआर नगर येथे ही दुर्घटना घडली असून ही ओम्नी कार राघवेंद्र पुजारी यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. घरासमोर कार उभी असताना अचानक गॅस सिलिंडरची गळती झाली आणि क्षणात कारने पेट घेतला. कार धगधगताना पाहून स्थानिक रहिवाशांची मोठी पळापळ झाली असून काही नागरिकांनी या घटनेचे चित्रीकरण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात केले आहे.

कारला आग लागल्याचे समजताच मालक राघवेंद्र यांनी स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आगीच्या भीषण ज्वाळांमुळे ते भाजले असून त्यांना दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यात यश मिळवले. ही घटना धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.

Tags: