Dharwad

रायापूरजवळ भीषण अपघात : दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

Share

हुबळी-धारवाड मुख्य रस्त्यावरील रायापूर येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन जवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

विजापूर येथील प्रज्वल आणि हुबळी येथील शंकर अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही धारवाडहून हुबळीच्या दिशेने केटीएम दुचाकीवरून अतिवेगाने जात असताना रायापूरजवळ चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी कोसळली. या भीषण अपघातात दोघांनीही जागीच प्राण गमावले.

घटनेची माहिती मिळताच धारवाड वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत. या प्रकरणी धारवाड वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Tags: