Khanapur

नंदगडमधील आनंदगड उद्यानाचा कायापालट होणार

Share

नंदगड ग्रामपंचायत आवारातील ऐतिहासिक ‘आनंदगड उद्याना’चे रूप पालटणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्थेत असलेल्या या उद्यानाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरण कामाची ग्रामविकास अधिकारी सागरकुमार बिरादार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

खानापूर तालुक्यातील नंदगड ग्रामपंचायत अंतर्गत असलेले हे उद्यान स्थानिकांचे आवडते ठिकाण आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील मुलांच्या खेळण्यांचे साहित्य आणि झोपाळे तुटल्यामुळे तसेच गंजल्यामुळे वापराविना पडून होते. ही बाब गांभीर्याने घेत पीडीओ यांनी तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

या उद्यानाच्या नूतनीकरणामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी उत्तम वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज आणि सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आनंदगड उद्यान आता पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या उत्साहात भर घालण्यासाठी सज्ज होत आहे.

Tags: