बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील तेलसंग गावात काल संध्याकाळी आकाशात एक विचित्र आणि गूढ आकृती दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीसह कुतूहलाचे वातावरण पसरले आहे. ही वस्तू म्हणजे परग्रहवासी किंवा ‘एलियन्स’ असावेत, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील तेलसंग गावात काल संध्याकाळी आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळाले. सुमारे तासाभरापेक्षा जास्त काळ एक गोलाकार वस्तू आकाशात विचित्र पद्धतीने फिरताना लोकांच्या निदर्शनास आली. हा प्रकार समजताच गावातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आणि आकाशातील त्या गूढ वस्तूचे निरीक्षण करू लागले. या गूढ आकृतीबाबत गावात सध्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
आकाशात वेगाने आकार बदलणारी ती वस्तू पाहून आपल्या गावात परग्रहवासी आले असावेत, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य कैद करण्यासाठी झुंबड उडवली होती. सध्या या गूढ आकृतीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही वस्तू हवामान विभागाचा फुगा आहे की खरोखरच एखादी दुर्मिळ खगोलीय घटना आहे, याबाबत लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.


Recent Comments