Belagavi

हुबळीतील ‘ऑनर किलिंग’च्या निषेधार्थ युवा कर्नाटक भीम सेनेचे आंदोलन

Share

हुबळी तालुक्यातील इनाम-विरापूर गावात घडलेल्या अमानवीय ‘ऑनर किलिंग’चा युवा कर्नाटक भीम सेनेने तीव्र निषेध करत राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला.

इनाम-विरापूर गावातील एका तरुण-तरुणीने प्रेमविवाह केला होता. मात्र, आंतरजातीय विवाहाच्या रागातून गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत असून ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

संघटनेचे नेते प्रवीण मादर यांनी आरोपींना तातडीने फाशी देण्याची मागणी केली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कडक कायदा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: