Belagavi

युवा कर्नाटक भीम सेनेकडून आणखी एका प्रेमी युगुलाची लग्नगाठ

Share

बेळगावमधील युवा कर्नाटक भीम सेनेने पुन्हा एकदा एका प्रेमी युगुलाचा विवाह लावून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

नवलगुंद तालुक्यातील बसवराज नडविनमनी आणि अश्विनी मादार हे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते, मात्र घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी संघटनेची मदत घेतली. डॉ. बी.आर. आंबेडकर उद्यानात भीम सेनेचे नेते प्रवीण मादार यांच्या नेतृत्वाखाली हा विवाह पार पडला. लग्नापूर्वी दोघांच्याही वयाची आणि कागदपत्रांची खात्री करण्यात आली असून, उपनिबंधक कार्यालयात विवाहाची नोंदणीही करण्यात आली आहे. विवाहानंतर या नवदाम्पत्याने संघटनेचे आभार मानले आहेत.

यावेळी प्रवीण मादार यांनी सांगितले की, या दोघांच्याही कुटुंबाकडून त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी धारवाडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. आंतरजातीय आणि प्रेमविवाहांना पाठबळ देऊन या संघटनेने पुन्हा एकदा चर्चेत स्थान मिळवले आहे.

Tags: