Belagavi

महिला विद्यालय हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शानदार प्रारंभ

Share

बेळगाव येथील महिला विद्यालय हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचीन बिचू यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. यावेळी विविध क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे शानदार सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि ध्वजारोहणाने झाली. यावेळी विद्यार्थिनींनी लाठी-काठी, योगासने, लेझिम आणि बँड पथकासह विविध भारतीय नृत्यांचे विलोभनीय प्रदर्शन केले. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने गुणवंत खेळाडू विद्यार्थिनींना ‘स्पोर्ट्स जॅकेट’ देऊन गौरविण्यात आले.

शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करणे आवश्यक असल्याचे प्रमुख पाहुणे सूर्यकांत हिंदलगेकर यांनी सांगितले. प्रत्येकाने जीवनात क्रीडा आणि व्यायामाचे महत्त्व ओळखले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मुख्याध्यापक के. एन. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले असून यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Tags: