Kittur

चड्डी गँगनंतर आता बेळगावात ‘मास्कधारी’ गँगची दहशत

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर शहरात चड्डी गँगच्या दहशतीनंतर मास्कधारी चोरांच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. या नवीन टोळीमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. चोरीच्या प्रयत्नाचे धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कित्तूरच्या कॉलेज रोडवरील एका सोन्याच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न या टोळीने केला. मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला मास्क लावून आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहेत. चोरांना कायद्याचा कोणताही धाक उरला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

व्यापारी पेठांमध्ये चोरांचा वावर वाढल्याने स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या मास्कधारी गँगचा तातडीने बंदोबस्त करावा आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. कित्तूर पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.

Tags: