Belagavi

न्यू इयर पार्टी : तरुणाईला माजी महापौरांकडून सतर्कतेचा इशारा

Share

नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत सावधगिरीने करा. पार्ट्यांनंतर होणाऱ्या संभाव्य अपघातातील जखमींच्या मदतीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची टीम जिल्हा रुग्णालयात तैनात असेल, अशी माहिती माजी महापौर आणि समाजसेवक विजय मोरे यांनी दिली आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या तरुण-तरुणींनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. आपल्या घरी आई-वडील आणि कुटुंब आपली वाट पाहत असते, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पार्टीच्या नादात अनेक तरुण अपघाताला बळी पडतात. ही बाब लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा रुग्णालयात आमची टीम मदतीसाठी सज्ज राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

३१ डिसेंबर रोजी रात्री १२ ते २ या वेळेत ही विशेष टीम जिल्हा रुग्णालयात उपस्थित असेल. अपघातासारखी दुर्दैवी घटना घडल्यास जखमींना तातडीने मदत मिळवून देणे आणि त्यांना आवश्यक सहकार्य करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा शब्दांत त्यांनी आपला मानस व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून विजय मोरे आणि त्यांची टीम सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवत आहे. यावर्षी देखील त्यांनी तरुणांना मद्यपान करून वाहने न चालवण्याचे आणि नियमांचे पालन करून सुरक्षितपणे नवीन वर्ष साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

Tags: