भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा आणि शौर्यशाली इतिहासाचा वारसा सांगणारा २०८ वा भीमा कोरेगाव विजयोत्सव गुरुवारी १ जानेवारी रोजी बेळगाव शहरातील आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आला आहे.

बेळगावमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात हा ऐतिहासिक विजयोत्सव साजरा केला जात असून सकाळी कार्यक्रमाला सुरुवात होईल. या सोहळ्यात विविध सामाजिक संघटना, दलित चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
प्रसिद्ध पत्रकार के. एन. दोडमणी हे भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व या विषयावर विशेष व्याख्यान देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मल्लेशा चौगुले, मल्लेशा कुरंगी, जीवन कुरणे यांच्यासह अनेक दलित नेते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत असून सर्वांनी उपस्थित राहावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments