बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील लोकापूरजवळ कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या धडकेत बस चालकाचा पाय तुटला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

हा अपघात बेळगाव-रायचूर राज्य महामार्गावर लोकापूर शहराच्या बाहेरील भागात घडला. ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने हा अनर्थ ओढवला आहे. यामध्ये चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला आपला पाय गमवावा लागला आहे.
बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर अनेक प्रवाशांनाही या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी लोकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, लोकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून याप्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवून घेतली आहे.


Recent Comments