अग्निवीर योजनेबाबतचे सर्व गैरसमज दूर सारून लाखो तरुण देशसेवेसाठी सज्ज होत आहेत. सैन्य दलात मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन तरुणांनी आपल्या जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश पूजेरी यांनी केले.


बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनांच्या महासंघाच्या वतीने भारतीय सैन्यात निवड झालेल्या नवनियुक्त अग्निवीरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानद अध्यक्ष रमेश चौगला, विकास जंगळी आणि महेश कम्मार यांनी उपस्थित राहून तरुण सैनिकांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात महासंघाचे अध्यक्ष जगदीश पूजेरी, उपाध्यक्ष संगप्पा मेटी, सहसचिव संतोष मठपती यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कित्तूर, खानापूर, इटगी, हुलिकवी, तोलगी, बसवन कुडची आणि नंदीहळ्ळी या गावांतील निवड झालेल्या अनेक तरुणांचा यथोचित गौरव करण्यात आला.


Recent Comments