कन्नड ही अत्यंत प्राचीन भाषा असून तिला दोन हजार वर्षांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. वचन साहित्याच्या माध्यमातून शरण कवींनी ही भाषा खऱ्या अर्थाने घडवली आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.


कित्तूर येथील तिसऱ्या कन्नड साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आजच्या आधुनिक युगात इंग्रजी भाषेची गरज असली, तरी तिचा वापर केवळ आवश्यकतेपुरताच मर्यादित ठेवावा. आपली मातृभाषा हीच प्रथम भाषा म्हणून जपली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना सुरुवातीपासून कन्नड भाषेतूनच बोलणे शिकवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. पालाक्ष शिवयोगीश्वर यांनी आपले विचार मांडले. संमेलनामध्ये पाच विविध साहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मडीवाळ राजयोगेंद्र महास्वामी, आमदार बाबासाहेब पाटील, मंगला मेटगुड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




Recent Comments