बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि समाजसेवक मौनेश्वर बाबू गरग यांना दिल्ली येथे ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित करण्यात आले.

‘भारत गौरव रत्न श्री सन्मान अवॉर्ड कौन्सिल’च्या वतीने समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा गौरव करण्यात आला आहे.
राजस्थानचे माजी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्या हस्ते गरग यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला लिथुआनिया, व्हेनेझुएला, झिम्बाब्वे आणि टांझानिया या देशांच्या दूतावासातील उच्चपदस्थ अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण पातळीवर समाजकारण आणि राजकारणात केलेल्या विशेष कार्यामुळे मौनेश्वर बाबू गरग यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला असून, बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


Recent Comments