बेळगाव येथील आदि जांबव मादिगा समाजाचे कार्यकर्ते राजू साके यांची जिल्हा काँग्रेस सफाई कर्मचारी घटकाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सफाई कर्मचारी विकास महामंडळाचे अध्यक्ष मुरली अशोक सालाप्पा यांनी ही निवड केली आहे. जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी राजू साके यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. एका कर्तव्यदक्ष कार्यकर्त्याला ही संधी मिळाल्याने पक्ष संघटनेला बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आपल्या निवडीनंतर राजू साके यांनी समर्थकांसह बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयुक्तांचा सत्कार करून विविध विषयांवर चर्चा केली.


Recent Comments