Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून बेळगाव तालुक्यातील विकासकामांची पाहणी

Share

महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी बेळगाव तालुक्यातील बेक्किणकेरी गावाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

गावात आगामी काळात आयोजित श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि यात्रेच्या नियोजनासाठी ३ कोटी रुपये खर्चून विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांची प्रगती नेमकी कुठपर्यंत आली आहे आणि कामाचा दर्जा कसा आहे, याचे सविस्तर अवलोकन मंत्र्यांनी या दौऱ्यात केले.

पाहणी दरम्यान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कंत्राटदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. सर्व विकासकामे दर्जेदार साहित्याचा वापर करून निश्‍चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, जेणेकरून भाविकांना आणि ग्रामस्थांना त्याचा तात्काळ लाभ मिळेल, असे त्यांनी म्हटले. कामात दिरंगाई झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, अशी ताकीदही त्यांनी दिली.

याप्रसंगी काडा अध्यक्ष युवराज कदम, जयवंत सावंत, मल्लाप्पा गावडे, गजू मोरे, अरुण गावडे, महादेव बांडगे, नारायण बांडगे, नारायण बोगन, मोहन पवार, महेंद्र बिरजे, गावडू गावडे, भरमा खादरवाडकर, विठ्ठल डी., मारुती खादरवाडकर, कृष्णा खादरवाडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: