बेळगावमधील आझाद गल्ली येथील मूळ रहिवासी आणि सध्या विजयनगर येथील साई नंदन रेसिडेन्सी येथे राहणारे चंद्रकांत यादवराव पाटील (७४) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. चंद्रकांत पाटील हे ‘रामा दलाल ट्रान्सपोर्ट कंपनी’चे मालक म्हणून परिचित होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता कामत गल्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच सोमवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता अस्थी विसर्जन विधी पार पडणार आहे.


Recent Comments