Belagavi

बेळगावात ११ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय तत्त्वज्ञ संमेलन रंगणार

Share

बेळगाव येथील एसीपीआर संस्थेच्या वतीने आगामी ११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील तत्त्वज्ञ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाबाबत एसीपीआर संस्थेचे सचिव एम. बी. झिरली यांनी माहिती दिली.

शुक्रवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संमेलनासाठी देशभरातील विविध विद्यापीठांमधील नामवंत तत्त्वज्ञ उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, ८ फेब्रुवारी रोजी बेळगावच्या रानडे मंदिरात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांमधील मोबाईलचे वेड कमी करण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांशी संपर्क साधण्यात आला असून पेन्टिंग स्पर्धेचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धाही घेतली जाणार आहे. या स्पर्धेत कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुब्रमण्यम भट्ट, सुहास जोशी, चंद्रशेखर रांगणेकर, दिनेश अन्वेकर, श्रीधर कुलकर्णी, नंदन हेर्लेकर, स्वाती जोग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: