महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गणेशपूर येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात स्थानिक नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या. दलित नेते मल्लेश चौगुले यांच्या निवासस्थानी जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या वेळी उपस्थित नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, घरकुल आणि महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध प्रश्न मंत्र्यांसमोर मांडले. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

“सामान्य जनतेच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी जनता दरबार हे एक प्रभावी माध्यम आहे. गणेशपूर परिसरातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

जनता दरबारामुळे आपल्या समस्या थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचवता आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी काडा अध्यक्ष युवराज कदम, आडवेश इठगीमठ, महेश कोलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments