कागवाड येथील गुरुदेव आश्रमात वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन महास्वामीजी आणि महातपस्वी सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ‘गुरु स्मरणोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


गुरुवार दिनांक २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कोल्हापूर कणेरी मठाचे बसवराज देवरु यांनी दिली. साधु-संतांच्या प्रवचनांची मेजवानी या आठवडाभराच्या उत्सवात दररोज विविध मठाधीशांचे प्रवचन होणार आहे. यामध्ये सडलगा गीताश्रमाचे डॉ. श्रद्धानंद स्वामीजी, कोडेकल बुदिहाळ मठाचे गांगेयुषित स्वामीजी, अत्तिगेरी मठाचे अध्यात्मानंद स्वामीजी आणि पू्र्मानंद तपसी आश्रमाच्या मातोश्री ज्ञानात्मताई आपली प्रवचने सेवा रुजू करतील. तसेच मंगळवारी विरक्तमठ बिलूरचे राजयोगी गुरुचनबसव महास्वामीजी, बुधवारी ज्ञानयोग आश्रम लक्षानट्टीचे शिवानंद महास्वामीजी आणि १ जानेवारी रोजी जुन्या हुबळीतील नीलकंठ मठाचे श्री श्री १००८ जगद्गुरु शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजींच्या सानिध्यात हा सोहळा संपन्न होईल.
जपयज्ञ आणि महापूजा गुरुदेव आश्रमाचे भक्त जे. के. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी रोजी जपयज्ञ आणि आशीर्वचन कार्यक्रम होईल. तर शुक्रवार २ जानेवारी रोजी सकाळी कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजींच्या उपस्थितीत श्री मल्लिकार्जुन महास्वामीजींच्या पादुकांचे महापूजन केले जाईल. मोफत आरोग्य तपासणी शिबिर या स्मरणोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार २ जानेवारी रोजी सकाळी ९ पासून सायंकाळपर्यंत अंकली येथील डॉ. मगदूम आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्रातर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत.
या अध्यात्मिक सोहळ्याचा आणि आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बसवराज देवरु स्वामीजींनी केले आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक संघटना आणि धर्मप्रेमी मोठ्या उत्साहाने तयारीला लागले आहेत.


Recent Comments