Belagavi

घटप्रभा येथे २७ आणि २८ डिसेंबरला बेळगाव विभागीय अभ्यास शिबिर

Share

येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी घटप्रभा येथील सेवा दलाच्या कार्यालयात बेळगाव विभागीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दलित संघर्ष समिती (आंबेडकरवाद) तर्फे आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश शोषित समाजाला खरा इतिहास सांगून जागृत करणे हा आहे. संघटनेचे राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे यांनी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मवळी शंकर आणि सिद्धप्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाक तालुक्यातील सेवा दल कार्यालयात हे दोन दिवसीय शिबिर पार पडणार आहे.

ज्याला आपला इतिहास माहित नाही, तो इतिहास घडवू शकत नाही, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जातीव्यवस्था आणि विषमतेविरुद्ध लढा देत समतेचा समाज घडवण्यासाठी संविधानाने दिलेली दिशा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सिद्धप्पा कांबळे यांनी केले.

शनिवार २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिबिराचा अधिकृत प्रारंभ होणार असून मवळी शंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन संपन्न होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित संघर्ष समितीचे राज्य प्रधान समन्वयक मवळी शंकर असतील. मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत सरजू काटकर उपस्थित राहणार आहेत.

या अभ्यास शिबिरात राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे, राज्य समिती सदस्य सावण्णा बडिगेर, राज्य संघटक रमेश डाकुळद यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होतील. बेळगाव विभागीय समन्वयक संजय कंबागी, जिल्हा समन्वयक नागेश कामशेट्टी, सेवा दल प्रमुख रवी नायक आणि लक्ष्मण दोडमणी यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला महांतेश तलवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: