Belagavi

बेळगाव जिल्हा काँग्रेस सफ़ाई कर्मचारी घटक अध्यक्षपदी राजू साखे

Share

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सफ़ाई कर्मचारी घटकाच्या बेळगाव जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी राजू गंगा साखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केपीसीसी अध्यक्षांच्या मान्यतेनंतर, राज्य घटक अध्यक्ष मुरळी अशोक सालप्पा यांनी या नियुक्तीचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. राजू गंगा साखे हे तातडीने आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि पक्षाच्या विचारसरणीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्य नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पक्ष तळागाळापर्यंत मजबूत करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल. केपीसीसीच्या निर्देशांनुसार पक्षाची तत्त्वे आणि ध्येयधोरणे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी साखे प्रयत्न करणार आहेत. अशी माहिती अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Tags: