हुबळी शहरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गामनगट्टी परिसरातील विमानतळ रस्त्यावर हा बिबट्या प्रथम दिसून आला असून, स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचे दृश्य टिपले आहे.

हा बिबट्या गोकुळ रोडवरील रेणुका नगर परिसरातही दिसून आल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्या आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून वनविभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवत असून, आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments