Belagavi

सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे बेवारस मृतदेहाची सन्मानपूर्वक रवानगी

Share

टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डनसमोर गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य असलेल्या एका अनोळखी वृद्धाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे बेवारस मृतदेहाची सन्मानपूर्वक रवानगी करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विजय मोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि पोलिसांशी संपर्क साधून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मृतदेह सन्मानपूर्वक रुग्णालयात हलवण्याची जबाबदारी पार पाडली.

टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय पुजारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन आवश्यक पंचनामा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा मृतदेह उत्तर-तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात पाठवण्यात आला आहे.

या कार्यात माजी महापौर विजय मोरे यांच्यासह नगरसेवक नितीन जाधव, पद्मप्रसाद हुली, संतोष दरेकर, संजय प्रभू, सतीश कुगाजी, जयदीप जाधव, शशिकांत आंबेवाडीकर, गौतम श्रॉफ, रुग्णवाहिका कर्मचारी निसार शमशेर, संजय कोलकर आणि पोलीस कर्मचारी नवीन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Tags: