विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे देवरहिप्परगी येथे भव्य स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय लिंगायत पंचमसाली समाज ट्रस्टतर्फे आयोजित वीरराणी कित्तूर चन्नम्मा विजयोत्सव आणि हिंदू संस्कृती मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.


कार्यक्रमासाठी यत्नाळ यांचे आगमन होताच चाहत्यांनी जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तत्पूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून उपस्थितांनी पंचमसाली आरक्षणासाठी लढा देण्याची प्रतिज्ञा घेतली.

या सोहळ्याला कुडलसंगम पीठाचे बसव जयमृत्यंजय स्वामीजी, विविध मठांचे मठाधीश, आमदार अशोक मनगुळी आणि राजूगौडा पाटील यांच्यासह हजारो शिवभक्त व समर्थक उपस्थित होते. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन सुरूच राहील, असे आमदार यत्नाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.



Recent Comments