उद्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे आवाहन करण्यात आले.

बेळगावमधील आझाद गल्ली आणि भोवी गल्लीतील अंगणवाडी सेविका तसेच सरकारी उर्दू शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांनी या जनजागृती रॅलीत सहभाग घेतला. उद्या रविवारी नवजात बालकापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांसाठी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना पोलिओपासून सुरक्षित करावे, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आल्याचे आझाद गल्लीतील अंगणवाडी सेविका प्रतिभा कडोलेकर यांनी सांगितले.
देशातून पोलिओचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी २१ डिसेंबर रोजी ही विशेष मोहीम आयोजित केली आहे. पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील मुलाला जवळच्या केंद्रावर नेऊन डोस पाजावा, अशी प्रतिक्रिया सुरेखा हट्टीहोळी यांनी व्यक्त केली.
ही जनजागृती रॅली टेंगिनकेरा गल्ली, आझाद गल्ली, भोई गल्ली, पांगुळ गल्ली, बागवान गल्ली आणि काकर गल्लीसह शहरातील प्रमुख भागांतून काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना मोहिमेची माहिती देण्यात आली.


Recent Comments