Chikkodi

आरएसएस आणि भाजपला संपवणे कोणालाही शक्य नाही: आमदार दुर्योधन ऐहोळे

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला संपवणे कोणालाही शक्य नाही, तसेच बेळगावचे अधिवेशन केवळ औपचारिकता म्हणून उरकले जात आहे, अशी घणाघाती टीका आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी केली आहे.

चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सभागृहात मंजूर करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण भाषण (Hate Speech) विधेयकाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, काँग्रेसने केवळ भाजप आणि आरएसएसबद्दल असलेल्या रागापोटी हे विधेयक मांडले आहे. मात्र, या संघटनांना संपवणे कोणाच्याही हातात नाही. मुख्यमंत्र्यांची चिक्कोडी जिल्हा करण्याची इच्छा होती, परंतु गोकाक, अथाणी आणि बैलहोंगलमधून जिल्ह्याची मागणी जोर धरू लागल्याने त्यांनी चिक्कोडीची घोषणा टाळली. बेळगावचे अधिवेशन केवळ नावापुरते असून उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्या सोडवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. भाजपने हे अधिवेशन १० दिवस चालवण्याचे पत्र दिले होते, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

सरकार सध्या अनुदानाच्या वाटपात मोठा भेदभाव करत आहे. काँग्रेस आमदारांना जास्त आणि भाजप आमदारांना कमी निधी दिला जात आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून हे सरकार दिवाळखोरीत निघाले आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Tags: