बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराबाहेरील मोरारजी देसाई निवासी शाळेच्या आवारात खेळताना विद्युत तारेच्या स्पर्शाने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या दुर्घटनेत मोरारजी देसाई निवासी शाळेचा विद्यार्थी कृष्णा मन्जुनाथ हेगडे याचा मृत्यू झाला आहे. तो मूळचा नवलिहाळ गावचा रहिवासी असून शाळेत दुपारच्या जेवणाच्या सुटीत मित्रांसोबत खेळत असताना ही काळाने त्याच्यावर झडप घातली.
मैदानावर क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्यासाठी कृष्णा मैदानाबाहेर गेला होता. यावेळी शाळेच्या आवारातच खाली पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा त्याला स्पर्श झाला. या तारेच्या स्पर्शाने कृष्णाचा जागीच अंत झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदविली आहे.


Recent Comments