मोबाईलचा वापर आणि चॅटिंग करणे बंद कर, असे पालकांनी सांगितल्याने एका १६ वर्षीय मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना हुबळी तालुक्यातील कुसुगळ गावात घडली आहे.

अरुणगौडा असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. घरात सतत मोबाईल वापरत असल्यामुळे आणि चॅटिंग करत असल्यामुळे पालकांनी त्याला समज दिली होती. पालकांच्या बोलण्यामुळे मन दुखावलेल्या अरुणगौडाने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले.
विष प्यायल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने शहरातील केएमसीआरआय (KMCRI) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्री त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments