विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॉम्बस्फोटाच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ घोषित केला आहे.


घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वानपथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बॉम्बची धमकी देणारा ई-मेल ज्या आयडीवरून पाठवण्यात आला आहे, त्याची तपासणी पोलीस करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Recent Comments