चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघातील अंकली, हिरेकोडी आणि खडकलाट या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती दिल्ली विशेष प्रतिनिधी तथा विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिली.


चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश हुक्केरी म्हणाले की, आमदार गणेश हुक्केरी आणि मी गेल्या वर्षभरापासून या तीन ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे कागदपत्रे सादर करत होतो. तसेच मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे याबाबत विनंती केली होती. त्यानुसार, २७ नोव्हेंबर रोजी अंकली ग्रामपंचायतीला आणि ११ डिसेंबर रोजी बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरेकोडी आणि खडकलाट या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे या तिन्ही पंचायतींमधील नागरिकांना यापुढे अधिक मूलभूत सुविधा पुरवणे सोपे होईल.
यावेळी खडकलाट ग्रा.पं. अध्यक्ष राकेश चिंचणे, सतीश पाटील, प्रल्हाद पाटील, नासर तशीलदार, ग्रामपंचायत सदस्य, हिरेकोडी गावचे सुरेश चौगला, दादा पटेल, शंकर टोन्ने, कुमार बुबनाळे, अश्वत्थ शितोळे, संतोष मठद यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments