बागलकोट जिल्ह्याच्या जमखंडी तालुक्यातील चिनगुंडी गावाच्या डोंगरावर सुरू असलेल्या अनधिकृत खाणकामाच्या धंद्यात बळी पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चिनगुंडी डोंगरावर ट्रॅक्टरमध्ये अवैधपणे माती भरण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. माती खोदत असताना अचानक डोंगर खचला आणि हणमंत (वय ३०) नावाचा मजूर जागीच मरण पावला. मृतदेह जमखंडी तालुका रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणी जमखंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments