Belagavi

आंतरराष्ट्रीय महिला उद्योजकता दिनानिमित्त पाच यशस्वी उद्योजिकांचा बेळगावात गौरव

Share

बेळगाव येथील वाणिज्य आणि औद्योगिक संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला उद्योजकता दिन २०२५ निमित्त विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या बेळगाव येथील पाच यशस्वी महिला उद्योजकांना गौरवण्यात आले.

यावेळी सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ. नीता देशपांडे, अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट्सच्या संचालिका सुनीता सुधाकर पटणकर, फ्लोमेक प्रिसीशन्सच्या संचालिका मंजुळा राजशेखर कल्याणशेट्टी, अदिती इन्फिनिटी स्टुडिओच्या भागीदार सारिका नागराज रायबागी आणि प्रीती पेपर्सच्या संचालिका प्रतिभा सुरेश होसूर यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बीसीसीआयचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी यांनी भूषवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा औद्योगिक केंद्राचे संयुक्त संचालक सत्यनारायण भट यांनी महिला उद्योजकांच्या योगदानाचे कौतुक करून आर्थिक विकासातील त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पुरस्कारप्राप्त महिला उद्योजकांचे कुटुंबीय, विविध संघटनांचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे पदाधिकारी सतीश कुलकर्णी, स्वप्नील शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: